कळमेश्वर: सहा दिवसापासून बेपत्ता युवकाचा लोणारा शिवारात विहिरीत आढळला मृतदेहb
मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी सायंकाळी लोणारा शिवारातील एका शेतातील विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृतकाची ओळख योगेश तुळशीराम सांभारे (वय ३६), रा. निंबोली, पोस्ट उपरवाही, ता. कळमेश्वर अशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा ११ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून बेपत्ता होता.