रामटेक: अज्ञात दुचाकी चालकाने दुकानदार महिलेच्या गळ्यातील स्वर्णभूषण ओढून पळविले
Ramtek, Nagpur | May 2, 2026 शुक्रवार दिनांक 1 मे च्या रात्री साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान विवेकानंद वार्ड येथील आपल्या घरीच असलेले किराणा दुकान सांभाळत असलेल्या एका महिलेचे स्वर्णभूषण ग्राहक बनून आलेल्या एका अज्ञात दुचाकी चालकाने जबरदस्तीने ओढून पळविल्याची घटना घडली आहे. घटनेची तक्रार रामटेक पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर तातडीने पोलिसांनी हालचाल करून घटनास्थळ गाठून अज्ञातांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सुरू केला.