अलिबाग: रेवस बंदर डिझेल तस्करी प्रकरण; आरोपीला न्यायालयात हजर
Alibag, Raigad | Jul 5, 2025 मासेमारीच्या नावाखाली बोटीतून डिझेलची तस्करी करणाऱ्या गणेश कोळीसह तिघांविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश कोळी याला अटक केली असून, त्याला शनिवारी दुपारी अलिबागमधील न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.