नरखेड: अवैध तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डोरली भांडवलकर येथील सिद्धार्थ रामदास कुकडे (वय ४१) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून, नरखेड पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.