चंद्रपूर: आषाढी एकादशी निमित्त पठाणपुरा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांडीयाळी
चंद्रपूर - आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पठाणपुरा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या "विठ्ठल-विठ्ठल" घोषणांनी दुमदुमून गेला होता. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हरिपाठ, भजन, कीर्तन, आणि अभिषेक पूजनामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला. महिला, पुरुष, वृद्ध आणि लहानग्यांचा समावेश असलेल्या भक्तांची मांडीयाळी संध्याकाळपासूनच मंदिरात पाहायला मिळाली.