नरखेड: : जलालखेडा पोलिसांची मोठी कारवाई: प्रतिबंधित सुगंधी तंबाखूसह एकाला अटक
जलालखेडा पोलिसांनी एका संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आढळून आला. या प्रकरणी रवीसिंग दिनेशसिंग ठाकूर (वय २५, रा. उत्तर प्रदेश) या आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी १३ लाख २४ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.