उमरगा तालुक्यात गांजाच्या शेतीवर मोठा छापा; ६५० किलो गांजा जप्त
उमरगा तालुक्यातील हिप्परगा (राव) वाडी येथील शासकीय गायरान शेतात छत्रपती संभाजीनगर नार्कोटिक्स विभाग आणि उमरगा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. पोलिसांनी बेकायदेशीर गांजाची शेती उद्ध्वस्त करत सुमारे ६५० किलो गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ३.५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.शासकीय गायरान जमिनीवर गांजाची लागवड केल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागताच शिवाजी एम्पले आणि कन्हैया भांगे हे संशयित आरोपी फरार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
#CrimeNews #dharashiv #Bignews #omrga #crimestory
Dharashiv, Dharavshiv | Oct 9, 2026