फ्री स्मार्टफोनच्या आमिषाने पुण्यातील परिचारिकेला ₹2.88 लाखांचा गंडा! 🚨
सोशल मीडियावर मोफत हाय-एंड स्मार्टफोन मिळणार असल्याची जाहिरात पाहून पुण्यातील 42 वर्षीय परिचारिकेने त्यावर क्लिक केले. त्यानंतर आरोपींनी मेसेजिंग अॅपवरून संपर्क साधत स्मार्टफोनसोबत चार्जर, स्मार्टवॉच, बॅग आणि एअरपॉड्स मिळणार असल्याचे सांगितले.
सुरुवातीला ₹720 डिलिव्हरी चार्ज घेतल्यानंतर ट्रान्सपोर्ट आणि इतर शुल्कांच्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. पैसे परत मिळतील या आशेने महिलेने अनेक पेमेंट केले.
अखेर 1 सप्टेंबरपर्यंत तब्बल ₹2.88 लाख रुपये तिच्याकडून उकळण्यात आले. फसवणूक लक्षात आल्यानंतर महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
⚠️ मोफत गिफ्टच्या नावाखाली पैसे मागितले जात असतील, तर सावध रहा. ऑफरची खातरजमा केल्याशिवाय कोणतेही पेमेंट करू नका.
📲 अशाच महत्त्वाच्या पुणे आणि महाराष्ट्रातील बातम्यांसाठी Times of Maharashtra फॉलो करा.
#Pune #PuneNews #PuneCrime #PuneCyberCrime #CyberCrime #CyberFraud #OnlineFraud #OnlineScam #FreeSmartphoneScam #ScamAlert #FraudAlert #CyberSecurity #DigitalFraud #MaharashtraNews #Maharashtra #PunePolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #MarathiNewsToday #TimesOfMaharashtra #सायबरक्राईम #ऑनलाइनफसवणूक #पुणेन्यूज #फ्रॉडअलर्ट