अकोला: अकोले तालुक्यात अवैध उत्खननाचं सत्र सुरूच.. महसूल विभाग झोपेत..?
अकोले तालुक्यातील गर्दनी येथे अवैधरित्या गौण खनिजाची लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. शासनाला फक्त पन्नास ब्रासचा कर भरून शेकडो ब्रासचं उत्खनन राजरोसपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल यंत्रणा नेहमीप्रमाणे डोळे बंद करून बसली आहे. हा सर्व प्रकार नेमकी कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होतोय.