रामटेक: गुडेगाव येथील युवकाची भारतीय सेनेत निवड; आदिवासी गोवारी बांधवांनी केला त्याचा सत्कार
Ramtek, Nagpur | Jun 22, 2026 रामटेक तालुक्यातील गुडेगाव या छोट्याशा खेड्यातील रोजमजुरी करणारे सुखदेव शेंद्रे यांचा मुलगा ऋषिकेश शेंद्रे याची भारतीय सैन्यात निवड झाली. याचा आनंद व अभिमान बाळगून सोमवार दि.22 जूनला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गुडेगाव येथे आदिवासी गोवारी फाउंडेशन रामटेक च्या वतीने गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. इतरांनाही यापासून प्रेरणा मिळावी हा या आयोजना मागचा एकमेव उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.