जालना: अवैध कत्तलखाना, मांस विक्रीवर महापालिकेची कडक कारवाई; शेड उध्वस्त, 5 हजारांचा दंड
Jalna, Jalna | Aug 19, 2026 शहरातील चामडा बाजार, दर्गा गल्ली आणि मंगल बाजार परिसरात अवैध कत्तलखाना तसेच अनधिकृत मांस विक्री करणार्यांविरुद्ध जालना महानगरपालिकेच्या पथकाने बुधवार, 19 ऑगस्ट रोजी कठोर कारवाई केली. या कारवाईदरम्यान संबंधित विक्रेत्याचे अनधिकृत शेड उध्वस्त करण्यात आले असून त्याच्यावर 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. शहरातील अनधिकृत कत्तलखाने आणि मांस विक्रीच्या ठिकाणांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चामडा बाजार आधी ठिकाणी कारवाई केली.