नागपूर शहर: नागपुरात गोवंश चोरी करून कत्तल करणारी टोळी जेरबंद; ५.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत संगम नगर परिसरातील पिवळी नदी नाल्याकाठी गोवंशाची कत्तल करण्याच्या तयारीत असलेल्या ३ जणांना रंगेहात पकडले. आरोपींनी एमआयडीसी हद्दीतून एक गाय चोरी करून ती चारचाकी वाहनातून क्रूरपणे व डांबून आणली होती.पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गाय, चारचाकी वाहन, छुरी आणि मोबाईल असा एकूण ५,४५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.