मंठा: दारूसाठी पैसे न दिल्याने मंठ्यात मावस भावाचा खून
विटेने मारहाण करून केली हत्या; मंठा शहर हादरले
Mantha, Jalna | May 27, 2026 मंठा शहरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मावस भावानेच मावस भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलीम महमूद शेख असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील शासनमान्य देशी दारू दुकानाजवळ घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत कलीम महमूद शेख याच्याकडे त्याचा मावसभाऊ शकील शेख अली याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्