अंबड: अंबड–जालना रोडवर भीषण अपघात; तीन जण जखमी, एक गंभीर
Ambad, Jalna | Mar 7, 2026 *अंबड–जालना रोडवर भीषण अपघात; तीन जण जखमी, एक गंभीर* अंबड–जालना रोडवरील फाट्यावर आज शनिवार (7 मार्च 2026) सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोटारसायकल, टीव्हीएस सुजुकी आणि “छोटा हत्ती” या वाहनांमध्ये झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून त्यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा बाबासाहेब वाघमारे व बाबासाहेब वाघमारे (रा. शारदानगर, व्यवसाय – मिस्त्री) हे जामखेडकडून अंबडकडे येत होते. त्याच वेळी डॉ. अफसर हबीब पठाण (रा. दुधना