अंबरनाथ: बदलापूर येथील शनी नगर येथील रिजन्सी आर्केड सोसायटीतील नागरिकांची परिसरातील भिंतीमुळे गळचेपी #Jansamasya
बदलापूर शनी नगर येथील रिजन्सी आर्केड या सोसायटीची गळचेपी होत असल्याचा आरोप सोसायटीच्या रहिवाशांनी केला आहे. या संदर्भात रहिवाश्यांनी आज दिनांक १७ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त करत माहिती दिली आहे. बाजूच्या सोसायटीने या ठिकाणी भिंत बांधली असून स्थानिकांनी विरोध केला आहे.