आरोग्य संवाद यात्रा | आरोग्यसेवेपासून जनतेच्या विश्वासापर्यंतचा प्रवास !
239 views | Gondia, Maharashtra | Nov 7, 2026 आरोग्य संवाद यात्रा | आरोग्यसेवेपासून जनतेच्या विश्वासापर्यंतचा प्रवास! शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध असणे महत्त्वाचेच; पण त्या सेवांवर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास असणे तितकेच आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ‘आरोग्य संवाद यात्रा’ याच विश्वासाला अधिक बळ देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या थेट ऐकणे, रुग्णालयांतील परिस्थिती प्रत्यक्ष पाहणे आणि आरोग्य यंत्रणेला जनतेच्या अपेक्षांप्रती अधिक उत्तरदायी बनवणे, या लोकसहभाग माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सर्वसामान्य नागरिकांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण आरोग्य व्यवस्थेचे खरे यश केवळ उभारलेल्या सुविधांमध्ये नाही, तर त्या सुविधांवर नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासात आहे!