जालना: आभासी चलनातील गुंतवणुकीच्या आमिषाने 4 कोटी 30 लाखांची फसवणूक; फरार वकिलाला अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | Sep 4, 2026 आभासी चलनात मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून तब्बल 4 कोटी 30 लाख 66 हजार 795 रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर पसार झालेल्या आरोपीला जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. शुक्रवार दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रमेश बाबुराव उत्तेकर, वय 54 वर्षे, रा. हरिओम पुरम सोसायटी, औंधगाव, पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने वकील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.