Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

*यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये पोट व लिव्हरच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा* *डॉ. प्रसन्न गोरे यांची पत्रकार परिषद* *उदगीर प्रतिनिधी* *दि. 07 ऑगस्ट 2026* *उदगीर* : पोट, अन्ननलिका, लहान-मोठे आतडे, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय व पित्तनलिकांच्या आजारांवर जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथे उपलब्ध आहेत. याची माहिती हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट *डॉ. प्रसन्न गोरे* यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशोदा हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अॅडव्हान्स्ड एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, Endoscopic Ultrasound, FibroScan, High Resolution Manometry, pH Monitoring, Capsule Endoscopy तसेच विविध Therapeutic Endoscopy सुविधा उपलब्ध आहेत. POEM, G-POEM, EMR, ESD, SpyGlass Cholangioscopy यांसारख्या प्रगत उपचारपद्धतीद्वारे अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार केले जातात, असे डॉ. गोरे यांनी सांगितले. अॅसिडिटी, अल्सर, पोटदुखी, गॅस, IBS, IBD, फॅटी लिव्हर, हेपाटायटिस B व C, लिव्हर सिरोसिस, पॅनक्रियाटायटिस, पित्ताशयातील खडे, पचनसंस्थेतील रक्तस्राव तसेच पोट, आतडे, लिव्हर आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान व उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. लिव्हर ट्रान्सप्लांट आणि रोबोटच्या साहाय्याने शस्त्रक्रिया सुविधा देखील येथे उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक एंडोस्कोपी सूट, समर्पित गॅस्ट्रो आयसीयू, 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहे. अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रो सर्जन आणि मल्टिडिसिप्लिनरी तज्ज्ञांची टीम रुग्णांना सेवा देत आहे. अचूक निदान व आधुनिक उपचारांमुळे राज्यासह देशभरातील रुग्णांचा यशोदा हॉस्पिटलवर वाढता विश्वास आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. *डॉ. प्रसन्न गोरे यांचा शैक्षणिक परिचय* डॉ. प्रसन्न गोरे यांनी मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी.जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमडी मेडिसिन ही पदवी संपादन केली. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथून त्यांनी डीएनबी मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी ही सुपरस्पेशालिटी पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कार्यरत आहेत. ते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी उदगीर येथे रुग्णसेवेसाठी येतात. *संपर्क* अधिक माहितीसाठी: किरण अप्पाराव बडे - 9154167997 *#उदगीर #यशोदा_हॉस्पिटल #GastroCare #LiverTreatment #HealthNews*

Latur, Latur | Aug 8, 2026

MORE NEWS