निवडणूक आयोगाची संदिग्ध भूमिका, निवडणूक प्रक्रियेत मतदार यादीतील घोळ, अनियमितता आणि लोकशाही व संविधानाची केली जाणारी प्रतारणा या विरोधात महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांनी 'सत्याचा 'मोर्चा' मुंबईत सकाळी ११ वाजता काढला. यावेळी मोर्चात सहभागी होत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात पहिला क्रांतीचा मोर्चा लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी आपण काढलेला आहे.