रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी!
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश; डीजे, लेझर बीम अनावश्यक.
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना विरोध नसून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे ध्वनी व वायू प्रदूषण रोखणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.गणेशोत्सव, मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे,लाऊडस्पीकर व लेझर बीमचा अनावश्यक वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच मिरवणुका आणि उत्सवांमध्ये
सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.नागरिकांनी उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण टाळून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#nagpur #highcourt #dj #festival