भिवापूर: महाबीज बियाणे विक्रीत नागपूर जिल्ह्यात भिवापूर खरेदी विक्री संस्था प्रथम, सुवर्ण महोत्सवी सभेत विशेष सत्कार
महाबीज बियाणे महामंडळ महाराष्ट्र राज्य अकोला या संस्थेच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नागपूर येथील हॉटेल हरिदेव येथे आज दिनांक 28 मे दुपारी महाबीज विक्रेते व डीलर एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला सन 2025 मधील खरीप आणि दोन सभेच्या रब्बी हंगामात जिल्हा खरेदी विक्री समिती लिमिटेड भिवापूर जिल्हा नागपूर या संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे