जालना: धारकल्याण शिवारात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी; ५६ हजारांचे लोखंडी साहित्य लंपास
Jalna, Jalna | Sep 5, 2026 तालुका जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धारकल्याण शिवारात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. बांधकामासाठी ठेवलेल्या सेंटरिंगच्या ८५ प्लेट, लोखंडी अँगल आणि लोखंडी सळया असा एकूण अंदाजे ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी भरत विठ्ठल उगले यांनी तालुका जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार भरत उगले यांच्या म्हणण्यानुसार, तीन ठिकाणी दरोडा पडला.