सडक अर्जुनी: जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव खजरी येथे "एक पेड मा के नाम" उपक्रमांतर्गत करण्यात आले वृक्षारोपण
जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव/खजरी येथे "एक पेड मां के नाम" या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात दिनांक पाच जुलैला वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकेश भेंडारकर तर प्रमुख अतिथीस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हार्दिक खोटेले, शामकाला हुकरे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक मधुकर येरणे सर, योगेश्वर कापगते सर, पृथ्वीराज चचाने सर, राजेश शेंडे सर, जीवन म्हशाखेत्री सर, रजनी मेश्राम मॅडम, भावना शेंदरे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.