नागपूर शहर: मित्रानेच रचला होता घात, खापरखेडा पोलिसांनी अवघ्या ६ तासांत केला पर्दाफाश!
नागपूरमधील कामठी रोडवरील बिनासंगम परिसरात फिर्यादी अमन दुबे आणि त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून तीन जणांनी रोख रक्कम, सोन्याची चेन आणि मोबाईल असा एकूण २,९६,८०० रुपयांचा मुद्देमाल लुबाडला. तांत्रिक तपासादरम्यान फिर्यादीचा मित्र लखन बादल सेठ यानेच साथीदारांसोबत संगनमत करून व्हॉट्सॲपद्वारे फोटो व लोकेशन पाठवल्याचे उघडकीस आले.खापरखेडा पोलिसांनी अवघ्या ६ तासांच्या आत मुख्य सूत्रधारासह ४ आरोपींना आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली.