जुन्नरच्या चिमुरडीच्या कुटुंबाला ७ दिवसांत ₹१० लाखांची मदत!
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने (PDLSA) अवघ्या सात दिवसांत पीडित कुटुंबाला ₹१० लाखांची आर्थिक मदत मंजूर केली.
महाराष्ट्र शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत ही मदत मंजूर करण्यात आली.
पुण्याच्या नव्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा PDLSA अध्यक्षा अंजू शेंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी या संवेदनशील प्रकरणाची तातडीने दखल घेतली. PDLSA सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रकरणातील कागदपत्रांची पाहणी करण्यात आली आणि मदतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.
गंभीर गुन्ह्यांतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत, कायदेशीर संरक्षण आणि पुनर्वसनासाठी आवश्यक सहाय्य देण्यास न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
📍 जुन्नर, पुणे | महाराष्ट्र
संपूर्ण बातमीसाठी पोस्टवरील स्लाइड्स पाहा.
#Junnar #JunnarNews #PuneNews #Pune #MaharashtraNews #Maharashtra #PuneDistrict #Pimpalwandi #ManodhairyaScheme #PDLSA #Justice #ChildSafety #WomenSafety #MaharashtraGovernment #BreakingNews #MarathiNews #MarathiNewsToday #MaharashtraNewsToday #TimesOfMaharashtra #NewsUpdate #LatestNews #PuneUpdates #JunnarUpdates #JusticeForVictims #News
Pune City, Pune | Aug 25, 2026