नो डीजे, फक्त नात आणि दुरुद-ओ-सलाम: शांततापूर्ण मिरवणुकीचा संदेशः
पिंपरी मध्ये 'ईद-ए-मिलादचा जुलूस,' मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय
पिंपरी चिंचवड - पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मोत्सवानिमित्त (ईद-ए-मिलाद) शहरात निघणारा पारंपारिक ‘जुलूस-ए-मोहम्मदी’ यंदा पूर्णपणे डीजेमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
मिरवणुकीत डीजे, गाणी, आणि नाचगाणी यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत मिरवणुकीदरम्यान वाढलेली डीजेची संस्कृती, कर्णकर्कश संगीत आणि अवाजवी हुल्लडबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक पावित्र्य राखून हा जुलूस शरीयतच्या नियमांनुसार आणि शांततेत पार पाडण्याचा संकल्प स्थानिक मशिदींच्या समित्यांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी एकत्र येऊन केला आहे.
सुरुवातः बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता पिंपरीतील डिलक
Pune City, Pune | Aug 25, 2026