2026 मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड t20 मालिकेच्या संदर्भात टीम इंडियाचे नागपुरात आज आगमन झाले. 21 जानेवारीला जामठा स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. नागपूर शहरात दाखल होताच खेळाडूंचे हॉटेल रेडिसन ब्ल्यू या आलिशान हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. हॉटेलच्या लॉबीमध्ये कडे कोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिकारी आणि खाजगी सुरक्षा रक्षक देखील उपस्थित होते.