भोकरदन: आनवा पाटी येथे शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचे मका,गहू, हरभरा व सागवान जळून खाक
आज दिनांक 28 मार्च 2020 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद या मुख्य रोडवर असलेल्या अनवा पाटील येथे शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांनी रब्बी मध्ये पेरलेल्या मका गहू हरभरा तसेच अर्धा एकर सागवान जळून खाक झाले आहे, यामध्ये शेतकरी रवी शास्त्री, राजीव वराडे, कैलास गोराडे ,प्रभू तळेकर यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले असून अग्निशमन विभागाने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विजू शकलेली नाही, या गीत लाखो रुपयाचे शेती पिके जळून खाक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.