त्र्यंबकेश्वर: नाशिकच्या बैठकीत त्र्यंबकेश्वरचे संपत नाना सकाळे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
त्र्यंबकेश्वर तालुक्याचे जेष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत नाना सकाळे यांची नाशिक येथे राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. यावेळी मंत्री ना. छगन भुजबळ , आ. सरोज आहिरे , आ. हिरामण खोसकर यांचेसह राज्य व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.