धुळे: धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पाण्यात, पोलीस अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ
Dhule, Dhule | Aug 24, 2024 धुळ्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे, त्यामुळे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत असून, याचा फटका आता पोलीस कार्यालयांना देखील बसताना दिसून येत आहे. शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वेढा आपल्याला बघावयास मिळत असून,सध्या पोलीस अधीक्षक कार्यालय हे पूर्णतः पाण्यात आहे, पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर गुडघाभर पाणी साचले असून आता या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील या गुडघ्यावर पाण्यातूनच मार्गस्थ व्हाव लागत आहे.