कळमेश्वर: येरला जवळ भीषण अपघात, कळमेश्वर च्या व्यक्तीस गंभीर दुखापत
कळमेश्वर येथील अरुण रामभाऊ गिरडकर (अंदाजे वय 50 वर्षे) यांचा नागपूरहून कळमेश्वरकडे येत असताना येरला परिसरात भीषण अपघात झाला.अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.