रामटेक: अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या हिवरा बाजार येथील आरोपीला न्यायालयाने सुनावली शिक्षा
Ramtek, Nagpur | May 22, 2026 पो.स्टे. देवलापर हद्दीतील महिला फिर्यादी हिच्या अल्पवयीन पीडित मुलीला आरोपी पंकज लाडे वय 20 वर्षे रा. हिवरा बाजार तह. रामटेक याने फिर्यादी यांचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन पीडित मुलीवर जबरी अत्याचार केला. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी ही गर्भवती झाली. देवलापार पोलिसांनी तपास करून आरोपी पंकजला अटक केली. या प्रकरणात 21 मे ला पोक्सो विशेष न्यायालयाने मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 12 श्री ए. ए.कुलकर्णी यांनी आरोपी यास वीस वर्षे सक्षम करावास व 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे.