रोहा: रोह्यात विजेचा सावळागोंधळ सुरूच
Roha, Raigad | Apr 16, 2026 रोहा तालुक्यात गेली चार पाच दिवस उष्णतेची भयानक लाट आहे. पारा 40 अंशाहून अधिक असून आधिच उष्याने नागरीक हैराण त्यात महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा सावळागोंधळ सुरु आहे. दुपारच्या सुमारास रोहा, धाटाव, कोलाड, खांब परिसरात होणारा खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील जनता कमालीची हैराण होत सर्वत्र संताप व्यक्त करत आहेत.