आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की मतदारसंघातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या जवळ जवळ सव्वाकोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या विकासकामामुळे स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि बाजारपेठेतील ये-जा करणाऱ्या शेतकरी, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.यावेळी वैजापूर गंगापूर मतदार संघाचे आमदार श्री.रमेशजी बोरनारे सर यांच्याअध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत झाले