जालना: गंभीर हल्ल्यात जखमी लखन तुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात नेल्याने तणाव
Jalna, Jalna | Sep 7, 2026 जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लखन तुरे यांचा उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाला. सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता मिळालेल्या माहितीनुसार लखन तुरे यांच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींच्या तातडीने अटकेची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढवळेश्वर परिसरात लखन तुरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.