*सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ* *माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन* भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.