कळंब: कळंबमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख 98 हजारांचा ऐवज लंपास
कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे ५-६ सप्टेंबरच्या दरम्यान घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी २२ ग्रॅम सोन्याचे दागिने व 10 हजार रुपये रोख चोरून नेले. ८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.