कळमेश्वर: नागपूर काटोल मार्गावर दहेगाव जवळ पाणी साचले, तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मंगेश गमे यांची मागणी
आज दिनांक 22 जून 2026 नागपूर–काटोल मार्गावरील दहेगाव रेल्वे गेट पुलियाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेग कमी ठेवावा, सुरक्षित अंतर राखावे आणि अत्यंत दक्षतेने वाहने चालवावीत. विशेषतः दहेगाव ब्रिज परिसरात जपून वाहन चालवावे.सदर बाबीची माहिती संबंधित रोड कॉन्ट्रॅक्टरला दूरध्वनीद्वारे देण्यात आली.