सेलू: भोसा येथे कौटुंबिक वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला, सिंदी पोलिसात गुन्हा दाखल.
Seloo, Wardha | Sep 22, 2024 कौटुंबिक वादातून भाऊजीने साळीच्या डोक्यावर लोखंडी फारी मारून गंभीर जखमी केले. ही घटना सिंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा (गौळ) येथे ता. 21शनिवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली. नंदा नरेश डोंगरे वय 45 वर्ष राहणार भोसा (गौळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मोहन बहाद्दूरे वय 55 वर्ष राहणार भोसा (गौळ) याच्याविरुद्ध सिंदी पोलिसात शनिवारी रात्री 9 वाजता गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती ता. 22 रविवारला सिंदी रेल्वे पोलिसांकडून प्राप्त झाली.