रामटेक: उबाठा चे रामटेक तालुकाप्रमुख रामप्रसाद कोकोडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश
Ramtek, Nagpur | Jun 28, 2026 शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत व त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रामटेक तालुक्यातील उबाठाचे तालुकाप्रमुख तसेच माजी सरपंच रामप्रसाद कोकोडे यांनी त्यांच्या अनेक सहकारी महिला, पुरुष, युवक,युवतीसह रविवार दिनांक 28 जूनला दुपारी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे जाहीर प्रवेश घेतला.