गतिमंद तरुणीवर बळजबळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगा येथे रविवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली या प्रकरणातील आरोपीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी प्रशांत खोब्रागडे यांनी दिली आरोपीचे नाव विजय नामदेव कीर्तन असे आहे