पनवेल: जेएनपीए-दिल्ली फ्रेट कॉरिडॉरला वेग
Panvel, Raigad | Mar 31, 2026 केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जेएनपीए-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाने आता वेग घेतला असून सोमवारी (30 मार्च) या मार्गावर ट्रायल इंजिनची पहिली यशस्वी चाचणी पार पडली. या यशस्वी चाचणीमुळे प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल परिसरातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेला नवी जोडणी मिळून मालवाहतूक व प्रवासी सेवेला गती मिळणार आहे.