नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीण पोलीस दलातील ७ अधिकारी व अंमलदार सन्मानित
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या नागपूर ग्रामीण पोलीस दलातील ७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.यामध्ये वैभवकुमार जगदेवराव जाधव यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.प्रमोद माणिकराव बोंगे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यातआले.