रोहा: मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष गाड्या
Roha, Raigad | May 29, 2026 मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर १ एकेरी विशेष गाडी चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (२ सेवा) गाडी क्रमांक 01173 विशेष गाडी दिनांक ३०.०५.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल.