इंदापूर: इंदापूर शहरातील बाजारपेठेतून काढली हनुमानाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक
Indapur, Pune | Apr 23, 2024 इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास इंदापूर शहरातील बाबा चौकापासून जुन्या पुणे सोलापूर मार्गाने वाजत गाजत हा हनुमंताच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक सोहळ्यात मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी झाले होते. शिवाय इंदापूर पोलिसांकडून या मिरवणूक सोहळ्याला बंदोबस्त ही पुरवण्यात आला होता.