भंडारा: भंडारा तालुक्यातील पहेला येथील लेआउटमालकांकडून मोठी फसवणूक; प्लॉटधारकांनी आत्मदहनाचा इशारा दिला
भंडारा तालुक्यातील पहेला येथील विवेकानंद लेआउटमध्ये 44 ऐवजी 50 प्लॉट पाडल्याचा आरोप. रस्ते आणि ग्रामपंचायतीची जागा विकून प्लॉटधारकांची फसवणूक केली. संतप्त प्लॉटधारकांनी गळ्यात फाशीचा फंदा अडकवून आंदोलन केले आणि न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.