अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम येथील विविध ठिकाणी आमदार बालाजी किनिकर यांनी केली पाहणी
आज गुरूवार रोजी दुपारी ४ वाजता अंबरनाथ पश्चिम मारवाडी, नवीन भेंडी पाडा येथे श्री श्री जगतगुरू हुब्बली सिद्दारुढा स्वामी मंदिराच्या सभा मंडपाचे काम आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले असून सदर कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगरसेवक रविंद्र करंजुले, सुभाष साळुंके, शिवसेनेचे आंब्रेश गौडा, मंदिराचे सेवक अम्माजी, वेंकटेश, समाजसेवक हाजी भाई तसेच स्थानिक नागरीक व मंदिराचे भक्तगणं उपस्थित होते.