इस्तेमा हा जमीन कब्जा करण्यासाठी केला जातो असं वक्तव्य मुंब्रा येथील भाजपाच्या नेत्या रिदा रशीद यांनी एका कार्यक्रमात केल होत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला असून आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास मुंब्रा येथे रिदा रशीद यांच्या विरोधात स्थानिक समाजसेविका सहर शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी सहर शेख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.