नांदेड - तळेगावातील उपसरपंच श्री मोगल लखुमाबेग इजाज बेग यांनी गावातील जनतेला केले आवाहन
1.2k views | Nanded, Maharashtra | Jan 21, 2026 सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया' मोहीम हाती घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात ही मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन उपसरपंचांनी यांनी केले आहे.