भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक सात जुलै रोजी भिवापूर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे कारगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता बारा चाकी टिप्पर मिळून आल्याने वाहन थांबून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली तिप्पट चालक नावे अभय शिवराम गोडाने व 28 वर्ष हा मिळून आला मालकाबाबत विचारपूस केली असता अक्षय घाट राहणार नागपूर यांचे सांगणे वरून रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याबाबत सांगितले